क्रिडा स्पर्धेचा समारोप समारंभ
क्रिडा स्पर्धेचा समारोप समारंभ
पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे मुलभूत प्रशिक्षण दि. 23/06/2025 रोजी पासून सूरु आहे. सदर प्रशिक्षणाकरीता विविध घटकातील एकुण 1332 प्रशिक्षणार्थीसाठी हजर झालेले आहेत. सदर नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी दि. 07/10/2025 ते 09/10/2025 या कालावधीमध्ये अंतर्गत क्रिडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन दि. 07/10/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर मा. श्री. विजयकुमार चव्हाण, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर क्रिडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रिडा प्रकार घेण्यात आले. सदरच्या क्रिडा स्पर्धा या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदान व महाराणा प्रताप कवायत मैदान मैदानावर घेण्यात आल्या. या क्रिडा स्पर्धेतून उच्च प्रतीचे खेळाडू निवडणे, त्यांच्यातील खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मुक्तपणे खेळाचा आनंद लुटावा आणि मागील काळातील खडतर प्रशिक्षणाच्या ताणांतून मुक्त होवून पुढील कर्तव्यासाठी ताजेतवाने व्हावे, या हेतूने मा. प्राचार्य सो यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे या क्रिडा स्पर्धेचे आयोजन करुन ही संधी प्रशिक्षणार्थी यांना उपलब्ध करुन दिली आहे.
सदर स्पर्धा या सोलापूर जिल्ह्यातील विविध स्पोर्टस् असोसिएशनचे नामांकित पंच, प्र.उप-प्राचार्य सुरेश निंबाळकर, आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी आणि कवायत निर्देशक यांच्या मदतीने पुर्ण केल्या. 1332 प्रशिक्षणार्थी यांनी एकुण 08 संघातून सांघिक व वैयक्तिक रुपाने सहभाग घेतला आणि क्रिडास्पर्धांचा आनंद लुटला. सदर क्रिडा स्पर्धेचा समारोप समारंभ दि. 09/10/2025 रोजी सायं. 17.30 वाजता मा. श्री. विजयकुमार चव्हाण, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण
केंद्र, सोलापूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली व प्र.उप-प्राचार्य सुरेश निंबाळकर तसेच सर्व आंतरवर्ग,
बाह्यवर्ग अधिकारी अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष
यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व
आभार प्रदर्शन प्र.उप-प्राचार्य सुरेश निंबाळकर यांनी केले तसेच सुत्रसंचालन पोउपनि शुभांगी
कोल्हाळ यांनी केले.
