POP प्रशिक्षण सत्र -26

मुलभूत प्रशिक्षण सत्र क्र. २६

नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे प्रशिक्षण सत्र क्र. २६ हे दिनांक १९/०९/२०२४ ते ०९/०६/२०२५ दरम्यान पार पडले असून त्यामध्ये मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, मिरा भाईंदर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, लोहमार्ग मुंबई व ठाणे ग्रामीण या घटकातुन आलेल्या एकुण ९८२ प्रशिक्षणार्थी यांनी नऊ महिन्यात उत्तम रितीने प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीना २२ पोलीस अधिकारी व ७ विधी निदेशक यांच्याव्दारे मुख्य कायदे, पोलीस संघटन, शास्त्रोक्त तपास, तपासाची कार्यपद्धती इत्यादी विषयाचे प्रशिक्षण उत्तम प्रकारे देण्यात आलेले आहे. तसेच भावनिक प्रज्ञावंत पोलीस या विषया संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. बाहयवर्ग प्रशिक्षण देण्याकरीता १३ बाह्यवर्ग अधिकारी व ४३ कवायत निदेशक हे नेमणूकीस आहेत. प्रशिक्षणार्थीना शारिरीक कवायत, पद कवायत, लाठी कवायत, शस्त्र कवायत, मॉब डिस्पर्सल ड्रिल, शस्त्र हाताळणी, ऑबस्टॅकल, योग इत्यादींचे उत्तम प्रशिक्षण देवून त्यांना शारीरीकदृष्टया व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात आले आहे.

बाहयवर्ग प्रशिक्षण देण्याकरीता १३ बाह्यवर्ग अधिकारी व ४३ कवायत निदेशक हे नेमणूकीस आहेत. प्रशिक्षणार्थीना शारिरीक कवायत, पद कवायत, लाठी कवायत, शस्त्र कवायत, मॉब डिस्पर्सल ड्रिल, शस्त्र हाताळणी, ऑबस्टॅकल, योग इत्यादींचे उत्तम प्रशिक्षण देवून त्यांना शारीरीकदृष्टया व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात आले आहे.

प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थीना १५ दिवसांचे कमांडो प्रशिक्षण देण्यात आले व धाराशिव येथील फायर बटावर दोन वेळा गोळीबार सराव आणि अंतिम परिक्षा घेण्यात आली. तसेच बीडीडीएस, श्वान पथक तसेच दंगल नियंत्रक पथक यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

याशिवाय सत्र क्र. २६ च्या प्रशिक्षणार्थीकरीता पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणा दरम्यान आर्थिक नियोजनाबाबत स्टेट बँक ऑफ इंडीया व भारतीय प्रतिभूति व विनिमय बोर्ड यांचे वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत लेक्चर आयोजित केले, धारा स्किलदेव फाऊंडेशन, मनी बी इन्स्टीट्यूट प्रा.लि. यांचेद्वारे आर्थिक साक्षरता आणि जागरुकता कार्यक्रम घेण्यात आले. तसेच फॉरेन्सिक सायन्स, फिंगर प्रिंट, डॉग स्कॉड इ. चे गेस्ट लेक्चर आयोजित करुन डेमो देण्यात आले. प्रशिक्षण केंद्रात क्राईम सीन तयार करण्यात आले आहेत. त्याव्दारे प्रशिक्षणार्थीना घटनास्थळ पंचनामा कशा पध्दतीने करावा याबाबत क्राईमसीन रुममध्ये प्रशिक्षण दिले गेले.

पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे करीता नवीन सुसज्ज असे ग्रंथालय तयार केलेले असून सदर ग्रंथालयात ३,५०० + पुस्तके आहेत तसेच १६ दैनिक वर्तमानपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. प्रशिक्षणार्थी यांचे साठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा देखील आहे. प्रशिक्षणार्थी यांचा शारीरीक व बौध्दीक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून फुटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, खो-खो इत्यादी खेळांची मैदाने तयार केली आहेत.

 प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थीना त्यांचे मनोरंजन व्हावे तसेच त्यांना कला गुणांना वाव मिळावा यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या छंदानुसार विविध क्लब तयार केले असून पेटींग, गायन, वादन, हस्ताक्षर इ. याकरिता सोलापूर शहरातील तज्ञ व नामांकित व्यक्तीव्दारे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणार्थीच्या पिण्याच्या पाण्याकरीता प्रत्येक हॉस्टेलमध्ये आर.ओ. चे पाणी चिलरसह उपलब्ध करुन देण्यात आले. प्रत्येक हॉस्टेलमध्ये मनोरंजन कक्ष उभारण्यात आले असून त्यामध्ये वर्तमानपत्रे, कॅरम, चेस, टिव्ही इ. साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या वापरावयाच्या पाण्यासाठी बाभुळबन ते तोरणा, रायगड व प्रतापगड होस्टेल पर्यंत पाईपलाईन टाकून वापरण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रशिक्षण सत्रातील पोलीस प्रशिक्षणार्थी यांना विधानसभा निवडणूक-२०२४ बंदोबस्ताकरीता सोलापूर ग्रामीण, धाराशिव व सातारा येथे पाठविण्यात आले होते. 

अशा प्रकारे प्रशिक्षणार्थी यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथून उत्तम प्रकारे शारिरीक, मानसिक दृष्टया भक्कम राहून पोलीस पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी विधि प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले व जनतेच्या सेवेसाठी सक्षम बनविण्यात आले.