सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राची स्थापना दिनांक १२ मे १९९४ रोजी झाली असून, हे केंद्र महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्था आहे. सुरुवातीला गुरुनानक चौक, सोलापूर येथे सुरु झालेलं हे केंद्र आता केगाव येथे ३२८ एकर विस्तीर्ण परिसरात कार्यरत आहे.
या केंद्रामध्ये नवप्रविष्ठ पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक (डिपार्टमेंटल), होमगार्डस यांना अत्याधुनिक साधनसामग्रीसह शिस्तबद्ध, व्यावसायिक आणि मानसिकदृष्ट्या सजग बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं.
आमचं ध्येय आहे – नैतिक मूल्यांवर आधारित, कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि समाजाच्या सेवेस तत्पर अशा पोलिस अधिकाऱ्यांची घडण. प्रशिक्षणामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक जागरूकता, आधुनिक शस्त्र प्रशिक्षण, परेड, मैदानी सराव आणि नेतृत्वगुण विकास यांचा समावेश असतो.
सतत सुधारणा, अनुभवसंपन्न प्रशिक्षकवर्ग, उत्कृष्ट अधोसंरचना आणि राष्ट्रसेवेची भावना या आमच्या केंद्राच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी आहेत.