आधारभूत सुविधा

निवास व्यवस्था

पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे एकुण 04 वसतीगृहे असून त्यामध्ये एकुण 1500 प्रशिक्षणाची यांची निवासाची व्यवस्था आहे.

प्रतापगड वसतीगृह

रायगड वसतीगृह

शिवनेरी वसतीगृह

तोरणा वसतीगृह

भोजन व्यवस्था

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या भोजनव्यवस्थेसाठी सुसज्ज असे अन्नपुर्णा भोजनालय असून एकावेळी 750 इतके प्रशिक्षणार्थी भोजन घेवू शकतात. अन्नपुर्णा भोजनालयासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे मेस देखरेख अधिकारी, 02 रापोउपनि, 04 अंमलदार, 10 वर्ग-4 कर्मचारी व इतर 16 कंत्राटी कामगार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्नपुर्णा भोजनालयामध्ये भोजन तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत :

पाणी व्यवस्था

या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी व पोलीस अधिकारी/ अंमलदार यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून प्रति तास 2000 लिटर क्षमतेचे 2 आर. ओ. सिस्टीम बसविण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना अन्नपुर्णा भोजनालय, प्रोव्हीजन स्टोअर, प्रशासकीय इमारत, इ. ठिकाणी पिण्याच्या पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पोलीस रुग्णालय

या प्रशिक्षण केंद्रामध्ये सुसज्ज असे पोलीस रुग्णालय स्थित असून त्यामध्ये 01 वैद्यकीय अधिकारी, 1 अधिपरिचारीका, 1 कक्षसेवक व । वर्णोपचारक (कंत्राटी कर्मचारी) कार्यरत असून आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना पुढील उपचारासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे पाठविले जाते.

व्यायामशाळा

या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी यांचेसाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा तोरणा वसतीगृहामध्ये उलब्ध करुन देण्यात आली आहे.